73 वर्षीय वृद्ध महिलेवर नराधमाने केला अत्याचार,आरोपीला अटक,परसोडा येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

एका 73 वर्षीय पीडित महिलेवर शारीरिक अत्याचार करत एका नराधमाने दमदाटी केल्याचा प्रकार वडकी पो,स्टे अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथे उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेने दि 31 डिसेंबर रोजी वडकी पोलीस ठाण्यात संशियत सुनील गुलाबराव कोल्हे वय 30 वर्ष रा परसोडा याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.पीडित महिला ही 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास गावातील नाल्याजवळ लाकडे गोळा करीत असताना संशयित आरोपी सुनील कोल्हे याने पीडित महिलेच्या जवळ येऊन बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला यात महिला ही जखमी झाली असल्याने तिला शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे भरती करून तिच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी वडकी पोलीसांनी संशियत आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती पोलिसांकडून आज दि 1 जानेवारी 2022 रोजी देण्यात आली आहे,पुढील तपास वडकी पो,स्टे करीत आहे.