
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी
नंदुरबार :- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. गेल्या ४ दिवसात तब्बल २१ कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात नंदुरबार तालुक्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसात ३-३ रुग्ण एकदिवशी सापडत होते. परंतु सोमवारी तब्बल ७ रूग्ण आढळून आले. ही नागरिकांसाठी धोक्याची घंटी आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावे , तसेच कोरोना संदर्भातील नियम पाळावे , मास्क नियमित वापरावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी सुध्दा मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक दुकानावर जाऊन दुकानदार व ग्राहक यांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. तसेच दंड वसूल करण्यात येत आहे.
