महाराष्ट्र ही वीरांची तसेच संतांची भूमी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी:- चेतन एस.चौधरी

महाराष्ट्र ही जशी वीरांची भूमी आहे तशी ती संतांची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात येऊन प्रत्येक वेळी मला कृतकृत्य होत , अस प्रतिपादन केंद्रीय सरंक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी दोंडाईचा जि. धुळे येथे केले.
आज दोंडाईचा शहरात दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचे अश्वारूढ स्मारक, शहिद अब्दुल हमीद स्मारक, तसेच १६ कोटी रुपये खर्चित राजपथ या रस्त्यासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाला.
यानंतर झालेल्या सभेत बोलताना श्री राजनाथ सिंह म्हटले की मी उत्तरप्रदेश मधून येतो. उत्तरप्रदेश व महाराष्ट्राचे जवळचे नाते आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे अयोध्येतून वनवासाला निघून बराच काळ महाराष्ट्रात वास्तव्यास होते. दोंडाईचा सारख्या “ब” वर्ग नगरपालिकेने केलेले हे विकास काम पाहून मी थक्क झालो. २५ वर्षांपूर्वी मी पाहिलेला हा परिसर आज खूपच प्रगती करतो आहे. मी आमदार जयकुमार रावल यांचे याबद्दल खुप खुप अभिनंदन करतो.
यावेळी खासदार सुभाष भामरे, उद्योगपती सरकारसाहेब रावल, नगराध्यक्षा मांसाहेब नयनकुंवर रावळ, जि. प अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष श्रीमती निकम, नगरपालिका मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते
.