
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी
नंदुरबार :- राज्यातील चार जिल्ह्यांचा सीडी रेशो ( कर्जवाटप ठेवींचे गुणोत्तर) चिंताजनक आहे.
त्यात खान्देशातील नंदुरबार, मराठवाड्यातील उस्मानाबाद, विदर्भातील वाशीम, गडचिरोली यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात सीडी रेशो ४० टक्क्यांच्या आत असून तो वाढविण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी आर्थिक समावेशन संकल्प अभियानाची सुरुवात प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत केले.
नाबार्ड ने आयोजित केलेल्या आर्थिक समावेशन संकल्प अभियानाची सुरुवात डॉ. कराड यांच्या हस्ते झाली. यानंतर बोलताना ते म्हणाले की राज्याचा सीडी रेशो ८५ टक्के असून तो समाधानकारक आहे. परंतु काही जिल्ह्यांचा रेशो कमी असल्याने अर्थ साक्षरता आणण्याची गरज आहे.
