
प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
नागरिकांनी वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरित बंद करावीत, अशा पद्धतीच्या सुचना श्री खांदे यांनी केल्या
