
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी
नंदुरबार :- धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आज मतदान पार पडले. मतदानासाठी मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला. महिला मतदारांचा उत्साह यावेळी बघण्यात आला. मतदानाची वेळ संपेपर्यंत एकूण 79.84 टक्के मतदान झाले.
धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना व काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होती.
सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपआपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. आता मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
दरम्यान सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. निवडणूक परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
