गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरसकट 50 हजार रुपयांची मदत द्या: विदर्भ राज्य आंदोलन समिती तहसीलदारांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

 

बाभुळगाव तालुक्यात 28 डिसेबर रोजी गारपीटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकरी हवालदील झाला असून नुकसान ग्रस्त गावाचा सर्वे करून शासनाने सरसकट 50 हजार रुपयाची मदत करावी अशी मागणिचे निवेदन तहसीलदार यांना मंगळवारी ४ जानेवारी रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने देण्यात आले मंगळवारी 28 डिसेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास अचानक आलेल्या गारपीटीने शेतशिवारा तील उभे पीक जमिन दोस्त केले खरीप हंगामातील तुर वेचण्यासाठी आलेला कापुस गारपीट सापडलेल्या कास्तकाराच्या तोंडाचा घास हिरावुन नेला
रब्बी हगांमातील चना गहु कांदा पालेभाज्या हळदीचे पिक गारीने बाधित होवून बागायती कास्तका राचे नुकसान झाले.यामुळे अचानक अवकाळी गारपीट झाल्यामुळे बाभुळगांव तालूक्यातील व ज्या गांवाचे नुकसान झाले आहे अशा गांवाचा त्वरीत सर्व्हे करून अशा शेतकऱ्यांना शासनाने सरसकट ५० हजार रुपयाची मदत करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे मा.तहसीलदार, बाभुळगांव यांना विदर्भ आंदोलन समिती चे जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे व व जय विदर्भ पार्टी चे जिल्हाध्यक्ष अरुण जोग व समीर शिंदे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.या वेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे तालुका अध्यक्ष समिर शिंदे , किसन तलवारे जय विदर्भ पार्टीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ जोग
व उपाअध्यक्ष अशोकरावजी कपीले व इतर कार्य करते उपस्थित होते.