
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जागजई येथे दरवर्षी परंपरे प्रमाणे मोठ्या प्रमाणात श्रीराम मंदिर , श्री . विठठ्ल मंदिर , श्री . निर्गुनशी महाराज संस्थान तर्फे श्री . संत झेबुजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो . पण यावर्षी कोरोना संक्रमण काळ सुरू असल्यामुळे व शासन आदेशानुसार जमाव बंदी व संचार बंदी लागु असल्यामुळे सदरील ३ फेब्रुवारीला होणारा उत्सव रदद् करण्यात आलेला आहे . तसेच देवालये पुर्णपणे देव दर्शनासाठी व कार्यक्रम साजरा करण्याकरीता शासन आदेशानुसार बंद करण्यात आले आहे . तरी सर्व भाविक भक्तांना सदरील बातमीच्या माध्यमातुन सुचित करण्यात येत आहे की , मंदिरामध्ये येवून गर्दी करू नये व शासन नियमांचे पालन करावे . असे आवाहन देवस्थान कमेटीचे अध्यक्ष प्रशांत वाऱ्हेकर व सदस्य यांनी केले आहे.
