
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक पाल याची काल रुग्णालय परिसरात हत्त्या झाल्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रशासन विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली.या घटनेचा निषेध करत काल पासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले .या दरम्यान रुग्णालय परिसर बंद केला होता. या घटनेतील आरोपीला अटक होई पर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला असून अशोक पाल च्या श्रद्धांजली निमित्य महाविद्यालयातील विध्यार्थी विद्यार्थिनींनी कॅडल मार्च काढला. यावेळी जवळ पास सहाशे विध्यार्थी या कॅडल मार्च मध्ये सहभागी झाले. हा कॅडल मार्च आंदोलन स्थळावरून घटना स्थळपर्यंत गेला। त्या नंतर त्याठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
