
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या आपण साजरा करित आहो स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आपल्याला झाली एरवी आपण देशभक्ती गीत गातो ,ऐकतो पण या देशभक्तीपर गीतातील अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे किंबहुना ते आपले कर्तव्य आहे असे विचार नागपूर येथील रवींद्रजी डोंगरदेव यांनी मांडले श्री स्वामी विवेकानंद विचारमंच द्वारा आयोजित एकदिवसीय व्याख्यान मालेत प्रमुख वक्ता म्हणून डोंगरदेव बोलत होते।।।ग्रामीण विकास प्रकल्प येथे ही व्याख्यानमाला संपन्न झाली व्याख्यानाचा विषय स्वातंत्र्याची 75 वर्ष हा होता यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे उपस्थित होते यावेळी जयोस्तुते हे गीत मुख्याध्यापिका मीनाक्षी ऐसेकर नीलिमा चिव्हाणे, पुरुषोत्तम मेढुलकर, नंदू टिपणवार, डॉ. सौ पोटदुखे यांनी सादर केले यावेळी संवादिनीवरती नंदू नालमवार तर तबल्यावरती रमेश वाघ होते कार्यक्रमाचा
समारोप -वंदेमातरम् या गीताने झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम चांदे यांनी प्रास्ताविक डॉ अश्विनि थोडगे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य मोहन देशमुख यांनी केले सोबतच स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ जयंती व स्वातंत्र्याची 75 वर्ष याचे औचित्य साधून श्री स्वामी विवेकानंद विचारमंच तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले ज्यामध्ये 77 रक्तदात्या युवक युवतींनी रक्तदान केले दि यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा ,न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेंद्र ताठे यांचेहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले शिबिरासाठी दि यवतमाळ अर्बन बँक,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,धन निरंकारी मंडळ ,पतंजली समिती यांचे सहकार्य लाभले यावेळी प्रदीप निकम या रक्तदात्याने 48 वे रक्तदान केले रक्तदानामध्ये युवकांचा विशेष उत्साह दिसून आला रक्तसंकलन डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी केले रक्तपेढीचे डॉ पाटील व त्यांच्या चमूने रक्तसंकलन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली वाणी यांनी तर आभार प्रदर्शन विकास वाघमारे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
