
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नगर पंचायत राळेगांव च्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार जानरावभाऊ वामनराव गीरी यांना झालेल्या मतदाना पैकी पन्नास टक्के अधिक मते मिळाली. हे या वेळच्या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे हे विशेष.
या प्रभागात एकंदर सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. काँग्रेस पक्षाचे जानराव गीरी यांना दोनशे अठ्ठाहत्तर मते, पाचशे पच्चावन मतां पैकी मिळाल्याने,पन्नास टक्के अधीक मते मिळवून विजयी श्री मिळवली आहे. जानरावभाऊ गीरी हे चारदा सलग ग्रामपंचायत राळेगांव चे सदस्य, उपसरपंच,पंचायत समिती राळेगांव चे सदस्य
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव व खरेदी विक्री संघ राळेगांव चे माजी संचालक,व विद्यमान अध्यक्ष ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे आहे .आणि दोन पंचवार्षिक आधी अन्याय प्रतिकार मंच राळेगांव च्या वतीने मिलिंद धुर्वे यांना अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषद राळेगांव मधून जानराव गीरी व मित्र परिवाराने निवडून आणले होते हे विशेष
