
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या ‘अशोभनीय’ वक्तव्याविरोधात एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआयने आज रामनगर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.
रोशनलाल बिट्टू म्हणाले की, मुख्यमंत्रिपद सारख्या उच्च संवैधानिक पदावर बसलेले भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा रस्त्यावरच्या गुंडासारखे वागत आहेत. आम्ही आमच्या नेत्याबद्दल कोणतीही अपशब्द खपवून घेणार नाही, कोणीही असे केल्यास कायद्याला आणि एनएसयूआयला सामोरे जावे लागेल.
निवेदन देताना NSUI विधानसभा अध्यक्ष शफाक शेख, याकुब पठाण, उमेश बर्डे, सचिन शिंदे, गौतम पाटील, आदित्य पांडे, आकिब शेख, साहिल दहिवले, संकेत मेश्राम, नावेद शेख, मयुरी आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
