जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारीकांच्या सेवेला सलाम

कोरोना महामारित परिचारिकांचे काम अप्रतिम :- आप राजेश चेडगुलवार ( पुरुष अधीपरिचारक )



                     

फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लॅम्प” असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ 12 मे 1820 हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्यादिन” म्हणून साजरा केला जातो.

मागील कोरोना महामारीत नर्सेस तथा सर्व आरोग्य सेवकांचे कार्य अप्रतिम होते. काही नर्सेस यांना आपले जीव कोरोना मुळे गमवावे लागले . डॉक्टर नंतर पहिली हाक व धावं घेणारी व्यक्ती फक्त नर्स असते जी अपरंपार रित्या सेवा देत असतें. नर्सेस च्या सन्मानीत आम आदमी पार्टी अग्रेसर आहे , दिल्ली मध्ये केजरीवालांनी आरोग्य सेवा मोफत आहे व मोहला क्लिनिक , पॉलीकलिनिक, दवाखाना मध्ये सेवा मोफत देण्यात येत आहे . या मध्ये रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणा मध्ये मिळत आहे जी सद्या परिस्थिति आहे महाराष्ट्र सरकार ( महाविकास आघाडी ) आरोग्य सेवे कडे लक्ष देत नाही आहे अशी खंत आप चे राजेश चेडगुलवार ( परिचारक ) यांनी केले आहे .
मनपा निवडणूक करिता आयोजित मिटिंग मध्ये फ्लॉरेन्स नाईटटींगेल यांच्या जन्मदिनीं अभिवादन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महिला अध्यक्षा एड सुनीता पाटिल, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, मीडिया हेड राजेश चेडगुलवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे , डॉ सामील तुकडी, संतोष बोपचे युवा अध्यक्ष, सुनिल् भोयर् संघटन मंत्री महानगर, राजु कूड़े सचिव, सूजाता बोदेले , आरती आगलावे, जास्मीन शेख, रूपा काटकर , मनीषा पड़गेलवार, शबनम शेख, शाम चव्हारे, शैलेश ब्राम्हणे, विवेश् कच्चेला, मनोहर पाटिल, पूजा खोबरे, सुनील सदभैया, साखरकर काका, सिकंदर सागोरे, अशोक माहुरकर, गणेश बंसोड, अजय डुकरे, शंकर धुमाळे, सुरेश झाड़े, सैयद अली, उपस्थित होते.