
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा येथे गेल्या कित्येक दिवसापासून येथे गावठी दारूचा गाळप सुरू होता गावातील तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले याचा प्रामुख्याने त्रास गावातील महिला होत असून गावात दारुड्यांनी धुमाकूळ घातला होता बंदोबस्त करण्याकरिता झाशीची राणी महिला मंडळ गुजरी यांनी राळेगाव पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी केल्या परंतु या तक्रारीकडे कुणीही लक्ष घातले नाही शेवटी झाशीची राणी महिला मंडळांनी महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा येथे तक्रार दिली या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस कर्मचारी प्रमोद घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी महिला मंडळांनी मोहाची दारू गाळ्यात असतांना झडप घातली पोलीस व महिला मंडळाची आक्रमक भूमिका पाहून दारू गाळणाऱ्या इसमाने तिथून पळ काढला महिलांनी दारूचा ड्रम इतर साहित्य उद्ध्वस्त करून 42420 रुपयाचा मुद्देमाल पांढरकवडा पोलिसांनी ताब्यात घेतला महिला मंडळाच्या तक्रारीवरून गावठी दारू गाळणारा आरोपी वर विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 65 क ड इ फ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे पांढरकवडा पोलिसाच्या वतीने पोलीस कर्मचारी प्रमोद घोटेकर यांच्या कार्याचे गुजरी ग्रामस्थांनी व महिला मंडळांनी आभार मानले.
