वाढोणा बाजार आरोग्य केंद्राला डॉ. नसल्याने रिधोरा परिसरात खाजगी डॉक्टरांचा सुळसुळाट

वाढोणा बाजार येथील आरोग्य केंद्र चालतो लिपिक व A.N.M. च्या भरोशावर. या आरोग्य केंद्रात कित्येक पदे रिक्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

     

राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात खाजगी डॉक्टरांचा सुळसुळाट सविस्तर वृत्त असे वाढोणा बाजार आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या गावातील शेतकरी, शेत मजूर गोरगरीब जनतेची खाजगी डॉक्टरांन कडून अव्वाच्या सव्वा भावाने मोठी लूट होत असल्याचे दिसून येत आहे. वाढोणा बाजार आरोग्य केंद्रा मध्ये दोन्ही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने येथे गोरगरीब जनतेचा उपचार होत नाही. तर उपचारासाठी दाखल झाले तर त्याच्या वर A.N.M. तात्पुरता उपचार करतात व गोळ्या औषधी घेऊन रुग्णांना घरी परत यावा लागतो या आरोग्य केंद्रा अंतर्गत रिधोरा व रिधोरा परिसरा सह ३० ते ३८ गावे जोडली गेली आहे.८ उपकेंद्र यात रिधोरा, विहिरगाव, येवती, आठमुरडी,आजी,सावनेर, अंतरावर व दोन वाढोणा बाजार उपकेंद्र जोडली गेली आहे सदर अंदाजे ३० ते ३५ हजार लोकसंख्या या वाढोणा बाजार केंद्रा अंतर्गत येत असुन येथील सर्व गोरगरीब जनतेला खाजगी डॉक्टरांन कडून उपचार करून घ्यावा लागत आहे. तर या आरोग्य केंद्रामध्ये २ वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे तर A.N.M. ५ पद रिक्त आहे तर M.P.W. आरोग्य सेवक ५ पदे रिक्त आहे तर औषधी निर्माता १ पद रिक्त आहे तर टेकनिशयन १पद रिक्त आहे तर वाहन चालक१ पद रिक्त आहे असे या आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून सुद्धा याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत ना आरोग्य जिल्हा अधिकारी लक्ष देत तर या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३० ते ३८ गावातील शेतकरी, शेतमजूर गोरगरीब जनतेचा उपचार फक्त A.N.M. व लिपिक च्या भरोशावर होत असल्याचे रिधोरा सह परिसरातील नागरिकांन कडून बोलल्या जात आहे.