
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्यातील अर्जुना येथे ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थी सौरभ संजय वाळके, महेश रामदास भोयर, गोपाल श्रीकृष्णा वाशीमकर, भिषेक रमेश जोगे, सुरज श्रीकृष्णा गोल्हर यांनी शेतकर्यांना बीज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन दिले यावेळी विद्यार्थ्यांने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व व उत्पादन वाढीबाबत माहीती देते वेळी विद्यार्थ्यांनि शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यासाठी रायझोबियम , ट्रायकोडर्मा, पी.जी. आर. या घटकांचा वापर केला .
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर .ए . ठाकरे ,उपप्राचार्य मंगेश कडू, विषयतज्ञ डॉ ,प्रतीक बोबडे,प्रा. के. टी. ठाकरे ,प्रा.मिस प्रिया निंबेकर , प्रा. अमोल डोंगरवार , प्रा. कुणाल गावंडे , कार्यक्रम अधिकारी प्रा.सौरभ महानूर
या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास अर्जुना येथिल शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
