
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हंटले की विविध ठिकाणी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाते.
आजपर्यंत गावात कधीही शिवजयंती साजरी झाली नव्हती…
तेव्हा गावातील सर्व मित्र परिवार यांनी अनेकांना भेट दिली,ज्येष्ठ नागरिक,महिला यांच्याशी संवाद साधला आणि ठरवलं की आपण शिवजयंतीचा साजरी केली पाहिजे.
आणि आज अनेकांच्या सहकार्याने ऐतिहासिक अशी शिवजयंती आमच्या गावात साजरी केली गेली.आणि हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला…कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी सर्व मित्र परिवाराचे खूप खूप धन्यवाद….असेच सहकार्य पुढे सुद्धा लाभेल अशी अपेक्षा आहे.
या पुढे दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंती,विविध कार्यक्रम आयोजन करत राहील असा विश्वास कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिला…
