
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
वैराग्यमूर्ती सती सोनामाता यांच्या समाधी घटनेला २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ४१ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी संस्थेने पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा पुण्यतिथी उत्सव सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. दिनांक २८ / २ / २०२२ सोमवार ला महाप्रसादाचा कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा केला जाणार आहे. पुढील दैनदिन कार्यक्रम अशाप्रकारे असणार आहे काकडा दररोज सकाळी ४:३० ते ५:३० संध्याकाळी ५:०० ते ६:०० हरिपाठ दररोज सायंकाळी स६:३० ते ८:३० आरती. सोमवार दिनांक २८/२/२०२२ सकाळी ८ ते ११ सोनामाता पादुका पालखी सोहळा व दिंडी सहभागी भजन मंडळ बाहेर गावावरून व गावातून आलेल्या भजन दिंडीचा सहभाग दुपारी १२ ते २ काल्याचे किर्तन ह-भ-प श्री नारायणदास पडोळे महाराज संघ राहणार वरुड जिल्हा अमरावती श्री अन्नाजी घवघवे श्री गणेशराव फटिंग व श्री ज्ञानेश्वर मुडे यांच्या सहकार्याने व त्यानंतर दहीहंडी व काला सहभागी भजनी मंडळाचा मानपान दुपारी ३:०० वाजता अशा प्रकारे महाप्रसादाचा कार्यक्रम व पुण्यतिथी उत्सव सोहळा पार पडणार आहे. तरी या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला सर्वत्र भाविक भक्तांनी तन-मन धनाने व श्रमाने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अवलिया सती सोनामाता देवस्थान येवती (डोमाघाट) व विश्वस्त समस्त येवती ग्रामवासी भाविक मंडळींनी केली आहे.
