प्रफुल्लभाऊ मानकर यांचा येवती येथे जाहीर सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील

येवती तेथे शिवकृष्ण मंगल कार्यालय येथे प्रफुल्लभाऊ मानकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यावर सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत असणारे सहकार क्षेत्राचे नेते तथा राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्लभाऊ मानकर यांची यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा येवती येथील राजु ठाकरे, आशिष पारधी, पंकज गावंडे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामपंचायत तसेच सहकार सोसायटी वर नवनिर्वाचित म्हणून निवडून आलेल संचालक मंडळ यांच्या सयुक्त विध्यमाने प्रफुल्लभाऊ मानकर यांचा येवती येथे जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे, किरण कुमरे , प्रविण कोकाटे, मिलिंद इंगोले, निंछल बोभाटे, शामकांत येणोरकर , पुरुषोत्तम चिडे, राजु ओमकार, रवी निवल, राजेंद्र तेलंगे , अशोक काचोळे,रामु भोयर, राजु ठाकरे, पंकज गावंडे, आशिष पारधी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.