
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
वीज वितरण कंपनी राळेगांव ने भर उन्हाळ्यात ट्री कटिंग न केल्याने या वर्षी पाच वानरांचा मृत्यू विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
क्रांती चौकात पन्नास वर्षा पेक्षा जास्त वयाचे मोठे पिंपळाचे झाड आहे. त्याचे शेजारीच वीज वितरण कंपनी राळेगांव ची विद्युत डीपी आहे.
या पिंपळाच्या झाडावर अनेक वानर इकडून तिकडे उड्या मारत फिरत असतात. त्यामुळे झाडाच्या फांद्या थेट विद्यूत तारांच शाटसर्किट होतं आणि विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू मुखी पडल्याची दुर्दैवी ही आजची या वर्षभरात पाचवी घटना आहे.
या संदर्भात वीज वितरण कंपनी राळेगांव ला संबंधितांनी वेळोवेळी माहिती दिली आहे पण मात्र ट्री कटिंग न केल्याने मुके जनावरे नाहक जीवानिशी गेले आहे.
