
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 1 ऑगस्ट
रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी,अण्णाभाऊ साठे जयंती व संस्थेचे माजी मानद सचिव स्व. केशवराव चिरडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
प्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब धर्मे , संस्थेच्या सचिव डॉ.सौ.अर्चना धर्मे , उपप्राचार्य विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे , शिफ्ट इन्चार्ज अरुण कामनापुरे, हे यावेळी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमित्ताने शाळेतील अनेक शिक्षकानी, प्रमुख पाहुण्यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, तसेच संस्थेचे माजी मानद सचिव स्व. केशवराव चिरडे यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्व पाहुण्यानी पुष्पहार अर्पण करून या दिवंगत विभूती बद्दल आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन सूचित बेहरे यांनी केले. तसेच या कार्यक्रमास संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
