महिन्याला लाखों रुपयांची उलाढाल?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदीचा कायदा असूनही आणि यवतमाळ जिल्याचे पोलीस अधिक्षक यांचे सर्व अवैध व्यवसाय बंद करून कडक कारवाई चे स्पष्ट आदेश असतांनाही मात्र राळेगांव शहरात
व येथूनच संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोठ-मोठी दुकाने थाटून “उपरसे टापटीप, अंदरसे ‘दाम’ जाने” अश्या पध्दतीने हा व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत राजरोसपणे सुरु असूनही स्थानिक पोलीस प्रशासन व अमली पदार्थ
विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई का होत नाही? यामागे मोठं अर्थकारण असल्याचे समजतं.
राळेगाव शहरात कोरोणा काळात स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने प्रत्यक्षात अवैध गुटखा
जप्त करून संबंधिताला प्लास्टीक पन्नी वापरल्याचा ठपका ठेवून काही दंड ठोठावून मलींदा लाटल्याचा आरोप व तक्रारी सुध्दा झाल्या असून त्याबाबत संबंधित विभागाकडून अद्यापही चौकशी सुरू असल्याचे बोलले जाते.विशेष म्हणजे सहकारी संस्थेच्या व्यापारी संकुल मधील एका दुकानात मोठया प्रमाणावर अवैध गुटखा विक्री होत असल्याची चर्चा आहे.
आज हा अवैध गुटखा विक्रीचा व्यापार मोठ्या प्रमाणात शहरातील नवीन वस्ती, प्रभाग क्र. पंधरा येथून होत असून अल्पावधीतच हा व्यवसाय करणाऱ्यां नी गरीबांची घरे नियमबाहय विकत घेऊन रहिवास आणि हा अवैध गुटखा, सुंगधित तंबाखु ठेवण्याकरीता दुमजली मोठ-मोठ्या इमारती उभ्या केलेल्या
आहे. व्यवसाय संबंधित हा विभागांच्या मार्फत सुरळीत सुरू रहावा याकरीता या व्यवसायातील ‘मास्टर माईंड’ यांच्या मार्फत संबंधितांना दरमहा लाखो रुपयांची ‘खिरापत’ पोहचत असल्यानं आमचे कुणीही काही करणार वाकड करु शकत नाही या अविर्भावात हे अवैध गुटखा विक्री करणारे व्यवसायिक वावरत आहे. शहरात सुरू असलेला हा अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावा अशी मागणी या गुटख्यापायी निकामी होत असलल्या युवा पिढीच्या पालकांकडून होत आहे.
तरी या संबंधाने आता जिल्हा
पोलीस अधिक्षकांनी योग्य ती
पाऊले उचलावी व आरोग्यासाठी अती घातक अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करावा अशी मागणी होत आहे.
