{ भावपूर्ण श्रद्धांजली ] विजयराव भोयर यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नागठाणा येथील प्रतिष्ठित नागरिक विजयराव जानरावजी भोयर ( 72) यांचे आजाराने आज दुःखद निधन झाले.
विविध सामाजिक चळवळीशी ते जोडले गेलें होते. राळेगाव तालुक्यातील एक सभ्य, सुसंस्कृत, व विविध बाबीचा सखोल अभ्यास असणारे मनमिळावू तेव्हडेच साधे वेक्तिमत्त म्हणून त्यांचा लौकिक होता. सदैव हसमुख व मार्मिक बोलण्याची पद्धत, व ज्ञानाचा प्रचंड साठा त्यांच्या कडे होता. प्रत्येकाला आपलंस करण्याची हातोटी त्यांच्या अंगी होती. आज सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच तालुक्यात शोककळा पसरली.
मोजक्याच पण अतिशय भावस्पर्शी कविताचे लेखन त्यांनी केले. शेती व शेतकरी हा घटक केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेल्या त्यांच्या काव्यलेखनाला हमखास दाद मिळायची. त्यांच्या अकस्मात जाण्याने तालुक्याची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे पच्यात भाऊ, पत्नी, दोन मुली, जावई व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. त्यांची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली.