निसर्गासोबतच शासन सुध्दा पाहतय शेतकऱ्यांची परीक्षा, पाटबंधारे विभागाने लावली रस्त्याची वाट.

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथे विस वर्षादरम्यान मध्यम प्रकल्पाचे काम झाले असून त्या मध्यम प्रकल्पावर जाण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहने जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कालांतराने त्यानंतर काही वर्षाने पाटबंधारे विभागाने गावाच्या नदीपासून कँनालपर्यंत रोड काढला असून फक्त मातीकाम करून ठेवले असून त्यानंतर मात्र त्या रोडवर खडीकरण करण्यात आले नसून या अर्धवट कामाचा दरवर्षी अतोनात चिखलामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून या रस्त्याने ट्रक्टर,बैलगाडी तर सोडाच मोटर सायकल,सायकल व पायदळ सुद्धा चालणे मुश्किल असून याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा शेतकऱ्यांनी तोंडी विनंती करून सुद्धा याकडे संबधित विभागाने ढुंकुन सुद्धा बघितले नसून एकीकडे निसर्गाचा कोप व दुसरीकडे शासनाचे अधिकारी या दोन्ही संकटाला सामोरे जावे लागत असून याकडे लक्ष वेधून ताबडतोब खडिकरण करून शेतकऱ्यांना या नेहमी होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी होत असून सोबतच याच नदीच्या तोंडावर गावाच्या वरच्या बाजूला मध्यम प्रकल्प असून यावर्षी सततच्या पावसामुळे प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे या वर्षी ओव्हरफ्लो झाला असून गावालगतच्या नाल्यावर रपटा बांधला असून त्या नाल्यावरुन कंबरेच्या जवळपास पाणी रहात असल्यामुळे नाला पार करत असताना शेतकऱ्यांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत असून या रपट्याला फोडून चांगल्या उंचीचा पुल बांधून शेतकऱ्यांना या सततच्या त्रासातून कायम स्वरूपी मुक्त करण्याची मागणी वरूड जहागीर माजी ग्रामपंचायत उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व वसंत जिनिंग राळेगावचे संचालक रामधनभाऊ राठोड व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.