
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून
शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्यात शोभा यात्रा काढून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. परंतु पहिल्यांदाच मनसेच्या महिला सेनेकडून चंद्रपूर शहरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. मनसे महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा शोभा वाघमारे यांच्या नेत्रुत्वात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला.
चंद्रपूर शहराच्या जोडदेऊळ मंदिर परिसरात संध्याकाळी ५ वाजता शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली यामध्ये शिवछत्रपतींच्या वेशभूषा केलेल्या छोट्या मुलाला घोड्यावर बसवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक जोडदेऊळ ते गांधी चौक व तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नेण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मुली मुलांनी ठेका धरत सर्वांचे लक्ष वेधले. या शिवजयंती उत्सवात मनसे महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा शोभा वाघमारे यांच्यासह जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड वर्षा भोम्बले व इतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या उत्सवात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे तालुका अध्यक्ष विवेक धोटे. मनसे शहर मनोज तांबेकर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
