
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
युवक कॉंग्रेस कमिटीच्या फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश सोहळा दि.२४-२-२०२२रोजी सावर येथे पार पडला.या कार्यक्रमाचे उद् घाटक माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके हे होते . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर , या परिसरातील ज्येष्ठ ठाकरे काका, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश जी महानुर,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव चे नरेंद्र जी कोंबे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती महेन्द्र जी घुरडे, बाभुळगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनजी बनकर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा सरपंच चिमनापूर वासुदेव राव शिंदे ,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजुभाऊ पांडे, उपसरपंच सावर ईलीहासभाई, यवतमाळ जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अतुल जी राऊत, बाभुळगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा भाऊ ठाकरे , शेख बशीर भाई,राजुभाऊ पत्रे,विजयजी वानखेडे,देवराव मेश्राम,नासीरभाई , सिद्धेश्वर चौधरी,गनी पवार ,रतन इंगळे ,अहमद शहा,रज्जाकभाई,शरीफखा पठाण,आतीक पठाण,हैदर पठाण व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमात फलकाचे अनावरण करण्यात येऊन नवनिर्वाचित युवक काँग्रेसचे चे शाखा अध्यक्ष अमर किन्हाके , उपाध्यक्ष मोहन पारधी, उपाध्यक्ष राजिक कुरेशी ,सचिव पंकज लांडगे , सहसचिव ऋषीकेश ठाकरे,संघटक आकाश कुंभेकार , संपर्क प्रमुख मुक्तेदर खान, कोषाध्यक्ष प्रथमेश राऊत ,कार्यवाहक शैलेश शिरभाते,कार्यवाहक कृष्णा गुप्ता यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ रमेशजी महानुर , कृष्णाभाऊ ठाकरे,बाळासाहेब मांगुळकर,प्रा.वसंत पुरके यांनी युवकांना मार्गदर्शन करुन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शैलैशभाऊ गुल्हाने,कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव चे संचालक दिनेश भाऊ गुल्हाने व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले . कार्यक्रमाचे संचलन मोहन पारधी तर प्रास्ताविक शैलैशभाऊ गुल्हाने यांनी केले.तर आभार प्रदर्शन पंकज लांडगे यांनी केले.
