चार वर्षांपासून रखडलेली प्रधान मंत्री आवास योजना मार्गी लावा (संघर्ष समितीची मागणी )

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव नगर पंचायत कडून साडेचार वर्षापासुन प्रधानमंत्री आवास योजनेची अमलबजावणी सुरू असून प्रधानमंत्री आवस योजनेचा नियमित बांधकामाचा तिसरा हप्ता मिळला नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेचा रखडलेला प्रश्न सर्वसाधन सभेत मार्गी लावावा अशा आशयाचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने नगराध्यक्षाना देण्यात आले.
नगर पंचायतच्या डी.पी.आर. १ मधील १७६ लाभार्थी कुटूंबापैकी जवळपास १३० कुटूंबांनी घरकुलाचे बांधकाम केले आहे व प्रगतीत आहे . नियमात बांधकाम करणाऱ्या लाभार्थी कुटूंबांना अनुदानाचे २ हप्ते मिळाले आहे . तर ३ वर्षापासून अनुदानाचा तिसरा हप्ता मिळालेला नाही . घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थी कुटूंबाची भिक नको पण कुत्र आवरा अशी गत झालेली आहे . तर प्रधानमंत्री घरकुल प्रस्ताव करणाऱ्या कंत्राटदार हरीओम बहुउददेशिय संस्थेचे संचालक भट्टड यांना जवळपास १४ लाख रूपयेचे देयक १४ वा वित्त आयोग या निधीतून देण्यात आले आहे . जे नियमबाहय असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी सी.आर. नं . १६ ९ १ वर करण्यात आली आहे . घरकुल डि.पी.आर. २ मधील सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या ५८० लाभार्थी कुटूंबाचे मालकी हक्क पटट्टे बनविण्याचे काम ३ वर्षापासून खोळंबलेले आहे . उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालय राळेगांव कडून १३० लाभार्थी कुटूंबाच्या घराची मोजणी करण्यात आली होती . परंतु पुढे काय झाले काही कळाला मार्ग नाही . उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयाकडून सरकारी जागेवर राहणाऱ्या प्रधानमंत्री आवास लभार्थी कुटूंबाच्या घर मोजणी व मालकी हक्क पटट्याच्या कामास ३ वर्षापासुन टाळाटाळ करण्यात येत आहे . व प्रधानमंत्री आवास योजना ४०० घरकुल मंजुरतीसाठी हरिओम संस्थेकडे पडून आहे .प्रधानमंत्री दिवस योजना रखडलेली आहे तरी पण हा विषय नगरपंचायत सर्व साधारण सभेत विषय पत्रिकेवर घेऊन चर्चा घडवून आणावी व घरकुल योजना मार्गी लावण्यास मदत करावी असे आशयाचे निवेदन संघर्ष समितीकडून नगराध्यक्ष यांना देण्यात आले.या निवेदनावर बीपी शंकर नारायण गायधने, प्रतिभा अरुणराव डायरे, कल्पना विठ्ठल राऊत, नंदा नामदेव वानखेडे, नामदेव संभाजी तागडे, राजू मारोती झाडे, संतोष झिबाजी भावे, विठ्ठल वारलू वादाफळे भास्कर विठ्ठल चिव्हाणे,नारायण डोमाजी डंभारे, नारायण अर्जुन चुनारकर, प्रकाश कळमकर, भानुदास महाजन, राकेश देशपांडे, बेबी होले, रवींद्र कोहळे, पुंडलिक दारुणकर, निलेश खरजे, बेबी मोहकरे, वैभव महाजन, विजया चांदोरे, शितल चांदोरे, रामराव येंडे, वसंत कोदाने, संजय उरकूडे प्रभाकर एकोणकर,गजानन डंभारे, सुमन गायकवाड, महादेव लांबाडे, वसंत तीवसे, प्रमोद साठे, हरिओम ठाकरे, गजानन पानसे, चंद्रकला मेश्राम आदी संघर्ष समितीच्या सदस्यांनी स्वाक्षरीनिशी निवेदन देण्यात आले आहेत.