जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडून निराधारांचे वेतन जमा करण्यास विलंब,बँके समोर आमरण उपोषणाचा वंचितचा इशारा


तहसील कडून वेतन पाठवून देखील वेतन मिळत नाही



वणी तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेनकडून निराधारांचे वेतन दोन-तिन महीण्यांपासून का? थकविण्यात आले आहे. त्यामुळे निराधारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असुन निराधाराचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतिने वणी शाखेचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
वणी तहसील कार्यालय कडून निराधाराचे वेतन वेळेवर पाठविण्यात येत असल्याची माहिती असून सुद्धा वेळेवर निराधारांना त्यांच्या हक्काचे वेतन का? मिळत नाही या दिरंगाई कारण काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे दररोज निराधार लाभार्थी आपल्या वेतनासाठी बँकेत चकारा मारून आपल्या चपला झिजवत आहे. यात त्यांना आर्थिक व मानसिक फटका बसत आहे. याबाबत अनेक निराधार लाभार्थी येऊन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडत आहे. त्यामुळे आज ता. २ मार्च रोजी येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वणी यांचे व्यवस्थापकाला एका निवेदनाव्दारे निराधारांचे वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे. व ८ दिवसात वेतन अदा झाले नाही तर सर्व निराधारांना घेऊन बँकेसमोर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन, सुभाष परचाके यादी उपस्थित होते.

आदेशानुसार आम्ही काम करीत आहो – व्यवस्थापक
निराधारांच्या वेतना संदर्भात विचारणा केली असता आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करतो आहो, वरूनच आदेश आहे की सर्व निराधार व इतर शासकीय योजनेची रक्कम आर.टी. जी. एस. की किव्हा एन. एफ.टी करण्याचे सुचविण्यात असले आहे. तहसीलचे खाते स्टेट बँकेत असून ती त्यांची समस्या असल्याचे मत व्यक्त केले.

समस्या निरागस निराधाराची नाही बँकेने त्याचा निपटारा करावा – दिलीप भोयर
वेतन जमा होण्यास जी समस्या आहे. ती निरागस निराधारांची नाही. शासनाकडून वेळेवर जमा होत असून बँकेच्या समस्येची झड निराधारांनी का सोसावी त्यांनी काय चार चार महिने माती आणि दगळ खाऊन जगावे काय? ज्याकाही तांत्रिक त्रुटी असतील त्या बँकेने व शासनाने तात्काळ निकाली काढून निराधारांचे वेतन जमा करावे असे मत वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी मांडले.