
योगेश तेजे (कायर )
ग्रामपंचायत निवडणुक गावातील पुढार्यासाठी मोठी प्रतिष्ठेची व मानसम्मानाची असतात त्या सम्मानासाठी पुढारी जीवाची बाजी सुद्धा लावायला तयार राहतात तसेच
मी या पक्षाचा तो या पक्षाचा असा गावात गाजावाजा करतात त्याचीच प्रचीती आता होणार्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये पहायला मिळत आहे
कोरोनाच्या महाभंयकर सकंटाने अख्खे जग भयभित झाले होते त्या संकटाने भारतासारख्या देशाला कोरोनाने आपल्या कवेत घेतले होते त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेवुन
शासनाने फेब्रुवारी ते मार्च या महिण्यात जाहीर केलेल्या निवडणुका समोर ढकलल्या होत्या आणि त्याच निवडणुका कोरोना महामारी कमी होताच जाहीर केल्या आहे त्याचेचे वारे गाव खेड्यात जोरदार वाहत आहे यात गावातील चौंक पानटपरी किराणा दुकाण सलुन दुकान ही मुख्यता वारे वाहण्याचे ठिकाण असुन या दुकांनांमध्ये कोण निवडुन येईल कोणाचा पक्ष चांगला नविन की जुन्यालाच निवडुन द्यायचे यासारख्या चर्चा या दुकांनामध्ये रंगताना दिसत आहे
तर राञी शेकोट्यावंर कार्यकर्ते आपआपल्या पक्षाच्या योजना आखतांना दिसत आहे पक्षाच्या प्रचाराविषयी असो किवां खर्चाच्या बाबतीत असो अश्या प्रकारे गावखेड्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जोरदार रंग चढत आहे
