विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडून स्पर्धा परीक्षेतील यशाची अपेक्षा , शिक्षण सभापती भारतीताई पाटील ग्रेट भेट उपक्रम जि.प. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासकेंद्राचा उपक्रम
भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाची कास धरा – शिक्षण सभापती भारतीताई पाटील
तालुका प्रतिनिधी/ ५ मार्च काटोल : प्रत्येक विद्यार्थाने जीवनात ध्येय निश्चित केलेपाहीजे. ध्येयपूर्ती करतांना ‘मी हे करूच शकते ..’ असा आत्मविश्वास हवा, तारुण्याच्या उंबरठ्यावर ध्येयपूर्ती व जीवनानंद या दोन्हीची सांगड घालतांना प्राधान्यक्रम ठरविणे महत्त्वाचे आहे. भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाची कास धरली तर यश पायावर लोटांगण घालणारच. तुमच्या गरजांची पूर्तता जिल्हा परिषद, नागपूर कडून नक्की होईल मात्र त्याबदल्यात आम्हाला तुमच्याकडून स्पर्धा परीक्षेत यशाची अपेक्षा आहे असा हितोपदेश शिक्षण सभापती भारतीताई पाटील यांनी ग्रेट भेट’ उपक्रमातंर्गत जि.प. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र काटोल येथे दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती भारतीताई पाटील, मार्गदर्शक प्रा.अतुल कोचे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, जि.प. सदस्य समीर उमप, जि. प. सदरया पुष्पाताई चाफले, पं.स.सभापती धम्मपाल खोब्रागडे, पं.स. सदस्य संजय डांगोरे, पं.स. सदस्या लताताई धारपूरे, गट विकास अधिकारी संजय पाटील , प्रा.किशोर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी, प्रा. अतुल कोचे यांनी विविध स्पर्धा परीक्षा मधील बुद्धीमत्ता चाचणी विषयातील बारकावे समजावून सांगितले. तसेच बँकीग परिक्षेतील अभ्यासक्रमानुसार प्रश्नानिहाय विश्लेषण केले. यावेळी अभ्यास केंद्रातील प्रविणा काळे हिची विद्युत विभागात निवड झाल्याबद्दल व मनिष लाड याने ‘नेट’ परिक्षा उत्तीर्ण केल्याबददल मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या शिवरत्न सामान्य ज्ञान स्पर्धेत अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त करणारे डॉ.चंदु देशपांडे, ऋषिकेश निरडकर व गौरव उमप यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, संचालन वैष्णवी ठाकरे तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे, संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक मंगेश लाडसे यांनी अथक परिश्रम घेतले.