
पंचायत समिती काटोल व सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती काटोल येथे जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती श्री. धम्मपाल खोब्रागडे व प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती सौ. अनुराधा खराडे या होत्या.मान्यवरानी सर्व सामान्य बहुजन समाजाला नवे जीवन देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्यावर मार्गदर्शन केले तसेच प्रमुख उपस्थीत असलेले पंचायत समिती सदस्य श्री. संजय डांगोरे यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, तसेच काटोल समतादूत श्री. मोहन पांडे यांनीही सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक का म्हणतात यावर प्रकाश टाकला तसेच अनेक संस्थांची स्थापना केल्यात, त्यावेळस आर्थिक मदत सुद्धा केलीत असे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते यात प्रामुख्याने पस सदस्य अरुन उईके,सोनटक्के, भेलकर,येनूरकर, तभाने, तसेच अधीकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. संजय गणोरकर यांनी केलेत.
