
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दि.१४/०३/२०२२
मेजर गजानन पंजाबराव ठाकरे (बी.एस.एफ.)यांनी देशाच्या रक्षणासाठी गेले बावीस वर्ष अहोरात्र परिश्रम करून आपले योगदान देशसेवेसाठी दिले.त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आज दिनांक 14 /03/ 2022 ला घेण्यात आला.
प्रथमतः मेजर गजानन यांचा गावचे सरपंच माननीय प्रवीण भाऊ एंबडवार यांनी शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला व त्यानंतर संपूर्ण गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीदरम्यान गावातील माता-भगिनी यांनी जागोजागी औक्षवन करून सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना मेजर गजानन अत्यंत भारावून गेले होते. ज्या गावात मी जन्म घेतला; त्या गावकऱ्यांनी माझा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम घेतला, मी गावकऱ्यांचे उपकार कधीही विसरणार नाही अशा शब्दात आपले विचार व्यक्त केले.
यावेळी अंतरगाव येथील माजी सैनिक राहुल वनकर, जीवन कोवे व मेजर गजानन यांचे मित्र तलाठी शेंद्रे साहेब, सुरेश नगराळे, अरुण भाऊ बारहाते,राहुल वनकर यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चंदनखेडे यांनी केले व आभार प्रदर्शन गणेश एंबडवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच प्रवीण भाऊ एंबडवार, उपसरपंच महेंद्रजी उमरे
यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला सहकार्य विजय बुरले, पवनकुमार उमरे, गणेश बुरले, गजानन पेंदोर,अरविंद नागोसे, भीमरावजी भगत, गोपीचंद ठाले, राजूभाऊ एंबडवार संतोष बिलोरकर व गावातील समस्त नागरिक यांनी सहकार्य केले.
या अगोदर सुद्धा अंतरगाव येथील माजी सैनिक राहुल वनकर,जीवन कोवे सुद्धा देश रक्षणासाठी आपले योगदान दिले आहे.
