महागांव ग्रा.वि.का.स.संस्थेची निवडणुक अविरोध

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था महागांवचा कार्यकाळ संपल्यामुळे संचालक मंडळाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. 17मार्च ही तारीख या निवडणुकीची जाहिर करण्यात आली होती.13 संचालकाची संख्या असलेल्या येथील सभासदानी संस्थाचा निवडणूक खर्च वाचविंन्यासाठी ही निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . सर्व सभासदानी एकत्रित येवून सर्व समावेशक आशा उमेदवाराना पाठिंबा देत इतरानी उमेदवारी दाखलच केली नाही. स्थानिक सहकार क्षेत्रात अत्यंत महत्व असलेली ही सोसायटी अविरोध झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सन 2022ते 2027या पांच वर्षाच्या कलावधिसाठी पार पड़लेल्या अविरोध निवड मध्ये महिला राखिव प्रतिनिधि मतदार संघतून मंगला निब्रड, सुंनदा पिम्पलशेड़े,अनु. जात /जमात प्रतिनिधि मतदार संघतून विष्णु अत्राम,व्ही. जा. भ. ज. प्रतिनिधि मतदार संघतून विनोद चाहनकर, इतर मागास वर्ग प्रतिनिधि संघतून गणपत दौलत ढवस, सर्वधारण कर्जदार प्रतिनिधि संघतून गजानन खापने, विलास नेहारे, श्रावण बोंडे, हरिदास येसेकर, बापूराव डाउले, विनोद ठावरी, सुधाकर बलकी, बाळा गाडगे, यांचा समावेश आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी. नैताम यांनी काम पाहिले. अविरोधसाठी पैनल प्रमुख माज़ी सरपंच प्रदीप डाहुले, उपसरपंच अविनाश लांबट चंद्रशेखर थेरे, दिनेश गेड़ाम, गणेश खुसबूरे, नारायण बलकी, भालचंद्र गाडगे इत्यादिनी अथक परिश्रम घेतले.