
वणी : संविधानाच्या विरोधात जाऊन भाजपच्या मोदी केंद्र सरकार ने या देशातील उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांना देण्यासाठी कंबर कसली आहे.सर्वच सार्वजनिक उद्योग, शेती देण्यासाठी वेगवेगळे कायदे केल्या जात आहे. संविधानाने स्वीकारलेली समाजवादी व भांडवलदारी अशी मिश्र अर्थव्यवस्था डावलून पूर्णपणे भांडवलदारी अर्थव्यवस्था लागू करून देशातील जनतेची जवाबदारी झटकून टाकली आहे. ह्याचाच दुष्परिणाम म्हणून भांडवलदारांना कामगारांचे शोषण करून प्रचंड उत्पादन घेऊन देशातील जनतेला लुटून प्रचंड नफा मिळवता यावा यासाठी ४४ कामगार कायदे रद्द करून ४ श्रम संहिता तयार केल्या आहेत. ह्याचा विरोध करण्यासाठी देशातील कामगार सातत्याने संघर्ष करीत आहेत, त्याचाच भाग म्हणून दोन दिवसीय देशव्यापी संप दि.२८ व २९ मार्चला होत आहे. ह्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वणी येथील तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सी आई टी यु च्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री व मा. कामगार मंत्री यांना देण्यात आले.
या माकप, किसान सभा व सिटू च्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकरराव दानव यांनी केले.
या आंदोलनाला कॉ. शंकरराव दानव, माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, तालुका सचिव कॉ. दिलीप परचाके, सिटू च्या जिल्हा उपाध्यक्ष कॉ. प्रीती करमरकर, चंदा मडावी, प्रतिमा लांजेवार, किसन मोहूरले, आदींनी मार्गदर्शन केले.
या आंदोलनात प्रामुख्याने कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, आनंदराव पानघाटे, भास्कर भगत, संभा टोंगे, अश्विनी पोटेकर, ताई डोंगरे, कुंदा देहरकर, जयश्री सोनटक्के, वंदना भगत, माधुरी मडावी, ज्योती मालेकर, माधुरी कांबडे, विनोद नवघरे, शंकर गाऊत्रे उपस्थित होते.
