प्रेयसीच्या भेटीला रात्री आला प्रियकर ,चोर समजून दिले पोलिसांच्या हाती

रात्रीचे 1 वाजता वरोरा पोलीस ठाण्यात एक फोन येतो की बोर्डा गावातील एका नगरीत एका घरी चोर शिरला आहे.त्या नंतर गावातील एक दोन तरुणांना पोलीस ठाण्यातुन संपर्क करीत घटनास्थळी पोहचण्यासाठी मदत मागितली जाते. त्यानुसार वरोरा पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी रवाना झाले गावातील त्या तरुणाच्या मदतीने पोलीस घटनास्थळी 1.30वाजताच्या दरम्यान हजर झाले .घरच्यांनी त्या चोराला एका खोलीत बंद करून ठेवल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.पोलिसांनी त्या खोलीचे दार उघडून त्या तरुणाला पकडले व खोलीबाहेर आणत त्याला फटके देण्यास सुरुवात केली.त्यांनतर तो तरुण पोपटासारखा बोलायला लागला. सत्यता कळल्यानंतर सर्वच अवाक झाले.तो चोर नसून स्वतःला त्या मुलीचा प्रियकर म्हणून ओळख सांगू लागला त्यामुळे मात्र सर्वच विचारात पडले.मुलीला पोलिसांच्या समक्ष विचारले असता मुलीने याला दुजोरा दिला.

वरोरा शहरातील चिकन मार्केट या भागात कित्येक छपरी तरुण मुलींना प्रेमात पाडून त्यांचा वापर करतात. तशीच घटना आज पुन्हा पुढे आली. त्या तरुणाला त्याचा पत्ता विचारला असता तो चिकन मार्केट वरोरा येथे एक ठेला चालवत असल्याचे त्याने सांगितले. व तो त्या मुलीला भेटण्यासाठी आला असल्याचे कबुल केले.मुलीची आई व भाऊ एका कामानिमित्त बाहेर गावी जात असल्याने घरी फक्त वडील व मुलगी घरी होती.त्यामुळे घराच्या मागील मार्गाने हा तरुण घरी शिरला .मात्र ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घर मालकांना फोन करून सांगितले. या आधीही हा तरुण तिथे आल्याची त्याने कबुली दिली. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्व भांडाफोड झाला.एका उच्चशिक्षित मुलगी व तो दहावी नापास मुलगा असा या प्रेम प्रकरणाचा अश्या मार्गाने उलगडा झाला.

एका धर्मातील उच्च शिक्षित तरुणी तर दुसऱ्या धर्मातील दहावी नापास तरुण अश्या या प्रेम प्रकरणात मुलींना फसवून त्यांना धर्मपरिवर्तन ,त्यांचा वापर करणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे त्यांच्या वर अत्याचार करणे यासारख्या अनेक
घटना घडतात .त्यामुळे आपली मुलगी कुठे जाते काय करते कोणासोबत बोलते या सर्व बाबींवर मुलीच्या वडिलांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.अखेर त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची दुचाकी देखील जप्त केली आहे.