
नाशिक जवळ असलेल्या लहावित देवळाली गावा दरम्यान रेल्वेच्या पवन एक्सप्रेस या गाडीचा अपघात झाल्याचे रेल्वेने ट्विटरद्वारे कळविले आहे देवळाली लहवित दरम्यान झालेल्या या अपघाताचे कारण रुळाला गेलेले तडे हे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु रेल्वेकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही या अपघातात आत्तापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आणि अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वे पोलीस आणि वैद्यकीय सेवा या घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी हा अपघात झाल्याचे समजते देवळाली आणि लहवित दरम्यान पवन एक्सप्रेस चे 7-8 डबे रुळावरून खाली घसरल्याचे समजते.
