बॅरिकेडिंग चा लॉक डाऊन शी संबंध नाही – नाशिक पोलीस

शहरात सध्या विविध गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेडिंग केले जात आहे त्यामुळे शहरात लॉक डाऊन लागण्याची भीती सामान्य नागरिकांमध्ये पसरत आहे परंतु पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार या बॅरिकेडिंग चा लॉक डाऊन शी काही संबंध नसून गर्दी कमी करण्यासाठी बॅरिकेडिंग च्या परिसरातील नागरिकांना पास दिले जात आहे आणि एक तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास दंड ठोठावला जात आहे की जेणेकरून गर्दी नियंत्रणात राहील आणि उगीच रस्त्यावर कोणी फिरणार नाही.
शहरात खालील ठिकाणी बॅरिकेटिंग केले जात आहे.
M. G रोड
रविवार कारंजा
नेपाळी मार्केट
सातपूर भाजी मार्केट
त्रिमूर्ती चौक
पवन नगर भाजी मार्केट
कलानगर भोगे मार्केट
मनपा फ्रुट मार्केट
नाशिकरोड मीना बाजार
भगूर मार्केट.

प्रतिनिधि:तेजस सोनार ,नाशिक