नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळती,11 रुग्णांचा मृत्यू

प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळती
नाशिक शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयावर ताण वाढत आहे.आज दिनांक 21 /04/2021 ला दुपारी 1.30 च्या दरम्यान अचानक oxygen ची टाकी लिक झाली .त्यामुळे रुग्णांची पळापळ सुरू झाली.घटनेची माहिती मिळताच
अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन गळती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.रुग्णालयातील
काही रुग्णांना इतर अनेक ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरूआहे .या घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.