
प्रतिनिधी:तेजस सोनार ,नाशिक
शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी एका मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
सिंहस्थनगरमधील नऊजण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी वालदेवी नदी परिसरात फिरण्यास गेले होते. सायंकाळी सहा वाजेदरम्यान सर्वजण धरणाच्या काठावर फोटो काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी पाण्यात तोल जावून काहीजण पडले. पोहता येत नसल्याने सर्वांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने सहाजण पाण्यात बुडाले. सायंकाळी ७ वाजेनंतर अंधार झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे तरी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी वाडीवर्हे पोलीस, तहसीलदार व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर दाखल झाले.
