नाशिकच्या प्रख्यात बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब ?

प्रतिनिधी:तेजस सोनार,सुमित शर्मा

नाशिक मधील मध्यवर्ती भागात शरणपूर रोड जवळील ठक्कर बिल्डर यांच्या घराजवळ आज दुपारी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने शहरात खळबळ माजली. अखेर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्याच बरोबर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच बॉम्ब शोधक पथकाने त्या बॉम्बसदृश वस्तूवर तपास केला असता एक चेंडू मध्ये फटाक्यांची दारू भरून त्याला वात लावलेल्या अवस्थेत तो बॉम्ब होता. या खोडसाळ पणा मागे कोण आहे याचा पोलीस तपास सुरू आहे . तसेच काही लोकांनी ही मॉक ड्रिल असल्याचे सांगत होते परंतु पोलिसांनी ही मॉक ड्रिल नसल्याचे स्पष्ट केले आहे.