मातोश्री ग्रुप पिंपळनेर शाखे तर्फे तेथील ६१ लाभार्थी शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप

प्रतिनिधी’:सुमित शर्मा, नाशिक

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण २० %राजकारण या संकल्पनेतून अमोल भाऊ सोनवणे मित्र परिवार दहीवेल मातोश्री ग्रुप पिंपळनेर तर्फे धोंगडे दिगर येथील शेतकऱ्यांना ५०% अनुदानातून ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.मातोश्री ग्रुप पिंपळनेर शाखे तर्फे तेथील ६१ लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.व शेतकऱ्यांनी पिंपळनेर शाखेचे आभार मानले त्याप्रसंगी पिंपळनेर शाखेचे उदयभाऊ बिरारी,बबलुभाऊ पुराणिक,मयुर नांद्रे, धोंगडे दिगर येथील ताराचंद दादा अहीरे, गुलाबभाऊ चौधरी व शेतकरी बांधव उपस्थित होते.