
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
मागील चार ते पाच दिवसापासून प्रभाग क्रमांक 26 शाहूनगर परिसर ते आयटीआय पुलापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहेत ठेकेदाराने हा रस्ता अर्धवट स्थितीत एकाच बाजूला बांधून दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण बंद केले आहे त्यामुळे मागील चार ते पाच दिवसापासून रस्त्यावर कच साचून होती, हा रस्ता सिडको तून एमआयडीसी मध्ये जाण्याचा मुख्य रस्ता असून या कच मध्ये अनेकांच्या गाड्या घसऱ्याच्या व अनेक नागरिक जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे, या प्रश्नावर शाहूनगर येथील आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते सुमित शर्मा व शारदा सोशल ग्रुप यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील काही झाले नाही म्हणून आज आम आदमी पक्ष आणि शारदा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण अर्धा ते एक किलो मीटरचा रस्ता झाडू मारून कच साफ करण्यात आली सदर उपक्रमास आपचे शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील, सुमित शर्मा, जगबीर सिंग, एकनाथ सावळे, शारदा ग्रुपचे अनिकेत मंडाले, ओंकार थोरात, निलेश गांगुर्डे व इतर सदस्य उपस्थित होते
