महिला दिवस व डॉ शुभांगी सेवक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वात्सल्य वृद्धाश्रमात कार्यक्रम

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

महिला दिवस व डॉ शुभांगी सेवक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाशीक येथील हिरावाडी येथील वात्सल्य वृद्धाश्रमात कार्यक्रम आयोजित केला होता .आश्रमा चे संचालक सतिश भाऊ सोनार यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय समाजसेविका सौ चेतनाताई सेवक यानी करून दिला या प्रसंगी यश शर्मा जय शर्मा मिलिंद शर्मा डॉक्टर शुभांगी सेवक शुभ सेवक खुशबू सेवक आस्था फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ वैशाली ताई चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी आश्रमातील महिलांनी डॉक्टर शुभांगी यांचे औक्षण केले आश्रमात गरजेच्या वस्तूचे वाटप करण्यात आले आज आपल्या हातून झाडे लागतील ते उद्या आपल्याच कामाला येतील हे उद्दिष्ट ठेऊन आश्रमाच्या आवारात फळाची झाडे लावण्यात आली डॉक्टर शुभांगी व पाहुण्यांनी आजी बाबा सोबत नाच गाणी हितगुज केले त्यावेळी शुभांगी मॅडम ने सांगितले की त्या वेळोवेळी तेथे जाऊन हेल्थ चेकअप करतील आश्रमाचे संचालक सतिश भाऊ सोनार यांनी पाहुण्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला