
चंद्रपूर:येथील कु श्वेता दशरथ कौरसे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी 2019 च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले. तिचे वडील वेकोली चंद्रपूर विभागात कार्यरत आहे .आई गृहिणी आहे.मोठी ताई च मागच्या वर्षी जिला परिषद शिक्षक आहे .लहान भाऊ सुदधा उच्च शिक्षित होऊन इंजिनियर झाला आहे.कू. श्वेता दशरथ कौरासे हिने रामटेक येथे सिव्हिल पदवी प्राप्त केली .2018 मध्ये त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली.त्यानंतर तिने स्पर्धा नोव्हेंबर 2019 ला परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेची मुलाखत जानेवारी 2022 ला झाली. स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल 13 एप्रिल 2022 ला घोषित झाला .त्यामधे तिने घवघवीत यश संपादन करून संपूर्ण चंद्रपूर आणि परिवाराचा नाव उज्वल केलं.त्यात श्वेता दशरथ कौरासे हिने यश संपादन करत जलसंपदा विभागातील श्रेणी 2 या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली.या यशाचे श्रेय तिचे आई वडील व मोठी बहीण गुरुवर्य यांना दिला.
