
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आदर्श गाव रावेरी येथील शाळा उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा रावेरी येथील मुख्याध्यापिका ज्योतीताई मानकर याना आज रोजी सेवानिवृत्त झाल्याने गावातील लोकांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, त्याच वेळी गावातील शिक्षण समिती च्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला, ग्रामपंचायत यांच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला, मानकर मॅडम ह्या गावात सर्वांसोबत मिळून राहायचे त्यामुळे गावातील लोकांच्या खूप चाहतावर्ग त्यांनी तयार केला होता त्यानुसार त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्येक व्यक्ती हा जोडला गेला तसेच आजच्या कार्यक्रमात नवीन आलेले मुख्याध्यापक विकास झाडे यांचा सुधा सत्कार करण्यात आला व गोविंदराव धोटे सर यांचा जनमदिवास निमित्त शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मनोगत यक्त करीत असताना सर्वांचे डोळे भरून आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साहेबराव मेसेकर, प्र.पाहुणे राजुभाऊ तेलंगे सरपंच,सौ.अंजली पिंपरे, गजानन झोटिंग उपसरपंच,मनोहरराव बोभाटे तंटामुक्ती अध्यक्ष,महेश सोनेकर सर,सत्कारमूर्ती सौ.ज्योती मानकर मॅडम, श्री.सुरेश मानकर सर ,श्रीमती.सरलाताई देवतळे मॅडम शि.वी.अधिकारी श्री वैकुंठ घुगरे सर केंद्र प्रमुख, गोविंदराव धोटे सर, वर्षाताई तेलंगे,विकास झाडे मुख्याध्यापक व गावातील महिला व पुरुष वर्ग हजर होता कार्यक्रमाचे संचालन सिडामसर यांनी केले तर आभाळ प्रदर्शन आमदे मॅडम यांनी केले.
