विशेष: इंग्रजी उन्हाळी वर्गास साखरा राजा इथे सुरवात

         **

जि. प. उ. प्रा. शाळा साखरा राजा इथे गोपाळ गुडधे सरांच्या मार्गदर्शनात स्पोकन इंग्रजी कार्यशाळेला आज दि. ०२ मे २०२२ पासून सुरवात करण्यात आली . मराठी शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात इंग्रजी वाक्यरचनांच्या आधारे इंग्रजी बोलता येण्यासाठीचे कौशल्य शिकविल्या जाणार आहे . ज्याप्रमाणे आपली मुलं अगदी शाळेत येण्यापूर्वी च चांगली मराठीतून बोलायला लागली होती . ती मराठी मुलं आपल्या घरीच ऐकून ऐकून शिकलेली होती . हाच बेस घेवून मुलांना शक्य होईल तितकी इंग्रजीतून ऐकता येण्याची संधी उपलब्ध करुन देणे व मराठी वाक्यरचना व इंग्रजी वाक्यरचना या वेगवेगळ्या असल्यामुळे मुलांना स्वतःची वाक्ये इंग्रजीतून तयार करता यावीत यासाठी काळाशी संबधीत १२ वाक्यरचना व सहाय्यकारी क्रियापदांशी संबधीत २३ वाक्यरचना अशा एकूण ३५ इंग्रजी वाक्य रचनांचा आधार घेवून वाक्ये कशी तयार करता येतिल यासाठी मुलांची तयारी करुन घेणे हा या उपक्रमाचा उद्देश रहाणार आहेत . विशेषतः जि. प. मराठी शाळांमधली मुलही या उपक्रमातून चांगली इंग्रजी बोलू शकतील असा विश्वास गोपाळ गुडधे सरांना आहे . या उपक्रमासाठी दिपक पिरके , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती साखरा राजा व मुख्याध्यापिका श्रीमती भारती भास्कर बतकी यांनी उत्स्फूर्तपणे शाळेची वर्गखोली उपलब्ध करुन दिलेली आहे . गावात अशाप्रकारे उन्हाळी वर्ग सुरु झाल्यामुळे साख-यातील पालक वर्ग खुष आहे . हा उन्हाळी वर्ग २०२२-२३ सत्र सुरु होईपर्यंत सकाळी ७-३० ते ९-३० या कालावधीत निरंतर सुरु रहाणार आहे .