राळेगाव पोलिसाच्या आशिर्वादाने ग्रामीण भागात दारूचा पुरवठा?

वडकी येथील एक रहिवासी असलेले इसम राळेगाव पोलीस स्टेशन व कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नाकावर लिंबू टिचुन राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दारू पुरविण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. वडकी येथील दारू विक्री त्यांना कुणाचे पाठबळ ?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

   

राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील काही गावामध्ये राळेगाव पोलीसच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात देशी,विदेशी दारू विकल्या जात आहे. सदर ही देशी विदेशी दारू ग्रामीण भागात दापोरी (कासार),वनोजा,चिंखली,उंदरी,जागजंई,वालधुर,इंजापुर,आंजी,सावनेर, वाठोडा,सरई,निधा व या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या इतरही गावामध्ये देशी विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. सदर ही दारू पार्सल करण्याचे केंद्र बिंदू म्हणजे दापोरी (कासार) याच गावावरून वर्धा जिल्ह्यात तर राळेगाव तालुक्यात सुध्दा वरील गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू सर्व गावामध्ये दारू विक्रेत्यांच्या घरी घरपोच दारू पुरविण्याचे काम वडकी येथील एक इसम करत असल्याचे या गावामध्ये काही नागरिकांन कडून सांगितले जात आहे. गोरगरिबांच्या हाताला काम नाही. आणि ६० चा पव्वा १०० ते ११० रुपयांला वरील सर्व गावामध्ये विकल्या जात आहे. तर दिवस भर वणवण उन्हात काम करून २५० ते ३००रुपये मजुरी करून आंबट सेवकीन लोक दारू पिऊन गावामध्ये धुमाकूळ घालत आहेत तर कुणी आपल्या बायकोच्या मजुरीतुन दारू पीत आहे. बाईने आपल्या लेकरांना जगवायचे की आंबट सेवकीन नवऱ्याला दारू साठी पैसे द्यायचे अशी परस्थिती सध्या तरी या गावामध्ये सुरु आहे. वडकी येथील एक इसम आपल्या चार चाकी गाडीने घरपोच दारू पुरविण्याचे काम करत सदर वडकी येथील काही दारू विक्री त्यांना वडकी पोलीस यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. लाखो रुपयांचा गाड्या सहा दारू साठा जप्त केला आहे. परंतु या दारू विक्री त्यांनी आता आपला मोर्चा राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वळवला आहे. परंतु हा वडकी येथील एक इसम राजरोसपणे घरपोच दारू पोचविण्याचे काम करत असुन सुद्धा यांच्या वर कुणाचीच नजर नाही का ? दिवसा ढवळ्या दारू पोचविण्याचे काम हा एक इसम करत आहेत यांना कूणाचे पाठबळ ? असेही या गावामधील काही नागरिकांन कडून बोलल्या जात आहे. या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देवून ग्रामीण भागात होत असलेली दारू विक्री थांबवावी अशी मागणी वरील गावामधील नागरिकांनी केली आहे.