पडोली येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल व्हावे यासाठी माजी सैनिकांचे आमरण उपोषण, मनसेचा उपोषणाला पाठिंबा

पडोली येथे अत्यंत रहदारी व जड वाहतूक होत असल्याने अजपर्यन्त अनेक गंभीर अपघात या ठिकाणी झाले. तसेच या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्याने व बाजार तसेच दुकानांमधील गर्दी बघता चौकात वाहतूक नियंत्रण सिग्नल, चौकातील मधील बंद स्ट्रीट लाईट, गतिरोधक, व रस्त्याचे रखडलेले काम हे त्वरित व्हावे यासाठी माजी भारतीय सैनिक मनोज ठेंगणे हे आमरण उपोषणावर बसले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या चौकात सिग्नल व्हावे यासाठी गेल्या तीन वर्षात तीन वेळा निवेदने देऊन आवाज उठवला परंतु कोणताही निर्णय त्यावर झालेला नाही फक्त आश्वासन देण्यात आले.
सदर केलेल्या मागण्या रास्त असून संपूर्ण मागण्यांना यावेळी मनसेने उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
लोकांचा जीव वाचवा, व भविष्यात कोणताही गंभीर अपघात या ठिकाणी घडू नये यासाठी आपल्या मागण्यांना घेऊन एका निवृत्त भारतीय सैनिकाला आमरण उपोषण करावे लागत आहे, ही अत्यंत शरमेची बाब आहे अशी खंत यावेळी मनसेतर्फे व्यक्त करण्यात आली.
तसेच लोकशाही मार्गाने मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल अशी ग्वाही यावेळी मनोज ठेंगणे याना देण्यात आली.
यावेळी मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे,ग्राम पं सदस्य निशिकांत पिसे, कारण नायर, मयूर मदनकर, शुभम वांढरे, ऋषिकेश बालमवार, कार्तिक खंगार, यश घागरगुंडे उपस्थित होते.