आष्टोणा ते खैरी, कुंभा रोडची दुर्दशा,लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आष्टोणा ते खैरी, कुंभा रोडपर्यंत रोडची दुर्दशा झाली आहे. या रोडवर मोठे, मोठे खड्डे पडले आहे. त्यामध्ये पाणी साचून राहत असतात आष्टोणा येथील नागरिकांना खैरी येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच रुग्णास खैरी किंवा बाहेर उपचारासाठी नेण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत आहे. १९ मे २२ रोजी रात्री झालेल्या पावसामुळे ठीक ठीकाणी रोडवर तलावच झाले आहे. त्यामुळे या रोडवरुन कोणतेही वाहन चालवितांना वाहनचालकांची दमछाक होत असते. याकडे लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे व सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगन किंवा आपल्या निधीतून या रोडकडे तातडीने लक्ष देऊन आष्टोणा येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना व रुग्णास रोड जातांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देऊन सध्यातरी खड्डे बुजवुन पाणी साचुन राहणार नाही यांची काळजी घ्यावी, असे आष्टोणा येथील नागरिकांची मागणी होत आहे.