पंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ तायडे यांचा सपत्नीक सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळखुटी केंद्र झाडगाव पंचायत समिती राळेगाव येथे केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुनीता ताई धोटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती या होत्या तर उद्घाटक म्हणून प्रशांत भाऊ तायडे सभापती पंचायत समिती राळेगाव हे होते या कार्यक्रमास सौ अंजू ताई तायडे सरपंच पिंपळखुटी, शेख लुकमान साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव, श्रीमती सरला ताई देवतळे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, रिजवान शेख उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सी.के.शेळके केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक के.डी.तुमराम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशांत भाऊ तायडे सभापती पंचायत समिती राळेगाव यांचा त्यांनी सभापती पदावर कार्यरत असतांना केलेल्या उल्लेखनीय कार्याचा शाल श्रीफळ व जिजाऊ चरित्र पुस्तिका देऊन शाळेच्या वतीने माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या शुभ हस्ते यथोचित सपत्नीक गौरव करण्यात आला,
यावेळी प्रशांत भाऊ तायडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सविस्तरपणे अनुभव कथन केले, तसेच कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नांची गरज असल्याचे उपस्थित शिक्षकांना आवाहन केले.
या कार्यक्रमाला बीआरसी राळेगाव चे प्रशांत चांदोरे, प्रवीण देवकते व केंद्रातील सर्व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.के.शेळके केंद्रप्रमुख यांनी केले सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षक विजय ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेतील भाषा विषय शिक्षक महेश सोनेकर यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक के.डी. तुमराम, पुंडलिक देवतळे, कुमारी मायाताई राऊत,तुमराम नागभीडकर शा.पो.आ.स्वयंपाकी चंदाताई लोणारे व मदतनीस वनमाला ताई अडकिने आदि सर्वांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.